your walking style can reveal your personality type
चालतंय की! तुमचं चालणं व्यक्तीमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातं By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 10:33 PM2019-05-21T22:33:29+5:302019-05-21T22:43:18+5:30Join usJoin usNext तुमची देहबोली तुमच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल बरंच काही सांगते. तुमचं चालणंदेखील तुमच्या व्यक्तीमत्त्वाविषयी, स्वभावाविषयी खूप काही सांगून जातं. वेगानं चालणारे- तुम्हाला वेगानं चालण्याची सवय असेल, याचा अर्थ तुम्ही खूप मेहनती आहात. तुमच्यात खूप ऊर्जा आहे असादेखील याचा अर्थ होतो. तुम्ही अतिशय धाडसी आहात आणि तुम्हाला आयुष्यात गोंधळ नको, असादेखील याचा अर्थ होतो. हळू चालणारे- हळू चालणाऱ्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीत अतिशय सावध असतात. तुम्ही हळू पावलं टाकता याचा अर्थ तुम्ही आत्मकेंद्री (चांगल्या अर्थानं) आहात. हळू चालणारी माणसं शांत आणि तणावमुक्त असतात. आरामशीर चालणारे- एखादी व्यक्ती अतिशय आरामशीर आणि मान अगदी ताठ ठेवून चालत असेल, तर ती आत्मविश्वासानं भारलेली आहे, असं समजावं. संबंधित व्यक्तीला स्वत:बद्दल पूर्णपणे खात्री असून कोणत्याही गोष्टीची घाई नाही. घाईत चालणारे- कायम घाईत चालणाऱ्या व्यक्ती अतिशय जागरुक असतात. खांदे पाडून चालणारे- एखादी व्यक्ती थोडी वाकून, खांदे पाडून चालत असेल, तर ती व्यक्ती स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. डौलात चालणारे- अशा प्रकारे चालणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. या व्यक्तींसाठी आत्मसन्मान खूप महत्त्वाचा असतो.