Yubari Melon: हिऱ्यापेक्षा महाग आहे हे फळ, किंमत ऐकून विस्फारतील डोळे By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 09:23 PM 2022-04-23T21:23:26+5:30 2022-04-23T21:26:01+5:30
Yubari Melon: या जगात वेगवेगळ्या प्रकारची फळे सापडतात. या सर्वांची किंमतही वेगवेगळी असते. सर्वसाधारणपणे महागात महाग फळाची किंमत ही ४०० ते ५०० रुपयांपर्यंत असते. मात्र जर एखाद्या फळाची किंमत लाखो रुपये असल्याचे तुम्हाला सांगितलं तर. तर ते फळ खरेदी करणं सोडा, त्या फळाचा स्वप्नातही विचार करू शकत नाही. या जगात वेगवेगळ्या प्रकारची फळे सापडतात. या सर्वांची किंमतही वेगवेगळी असते. सर्वसाधारणपणे महागात महाग फळाची किंमत ही ४०० ते ५०० रुपयांपर्यंत असते. मात्र जर एखाद्या फळाची किंमत लाखो रुपये असल्याचे तुम्हाला सांगितलं तर. तर ते फळ खरेदी करणं सोडा, त्या फळाचा स्वप्नातही विचार करू शकत नाही.
जगात काही फळे अशी आहेत, ज्यांची किंमत ऐकताच तुमचे डोळे विस्फारल्यावाचून राहणार नाहीत. जपानमध्ये एक असं फळ सापडतं, ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. हे फळ खरेदी करण्याचा विचारही सर्वसामान्य करू शकत नाहीत. या फळामध्ये असं काय खास वैशिष्ट्य आहे ज्यामुळे हे फळ एवढं महाग विकलं जातं ते आज आपण जाणून घेऊयात.
जगातील सर्वात महागड्या फळामध्ये समावेश असलेल्या या फळाचं नाव युबरी टरबुज आहे. या फळाची शेती जपानमध्येच होते आणि तिथेच ते विकले जाते. या फळाची शेती सूर्यप्रकाशात नाही तर ग्रीन हाऊसमध्ये केली जाते.
जपानमध्ये मिळणाऱ्या एका युबरी कस्तुरी टरबुजाची किंमत १० लाख एवढी असते. २० लाख रुपयात दोन टरबुज मिळतात. सन २०१९ मध्ये दोन टरबुज तब्बल ३३ लाख रुपयांना विकले गेले होते. आतून नारिंगी रंगाचं दिसणारं हे फळ चवीला गोड असतं
त्यामुळे विविध प्रकारची महागडी दिसणारी फळं खाण्याचे शौकिन असलेली मंडळीही खिशात लाखो रुपये असल्याशिवाय या फळाच्या वाटेला जाऊ शकत नाहीत...