Zisiqiao village in eastern China's Zhejiang province has been snake farming
बापरे! काय सांगता, ‘या’ गावातील लोक करतायेत सापांची शेती; जगभरात गाजतंय गावाचं नाव! By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:09 PM2020-06-08T17:09:12+5:302020-06-08T17:12:12+5:30Join usJoin usNext सध्या कोरोना व्हायरस पसरण्यामागे चीन जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. याठिकाणी लोक मोठ्या संख्येने मांसाहार करतात, त्यातूनच हा आजार पसरल्याचं सांगण्यात येतं. तुम्ही भाजीपाला, फळांची शेती केली जाते हे ऐकलं असेल पण तुम्ही कधी अशा शेतीबद्दल ऐकलं आहे का? सापांची शेती केली जाते, ऐकून धक्का बसेल ना! पण हे खरं आहे. चीनच्या एका गावात विषारी सापांची शेती केली जाते, या गावाचं नाव जिसिकियाओ असं आहे. याठिकाणी तब्बल ३० लाखपेक्षा जास्त सापांचे प्रकार आढळतात. १ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सापांची शेती करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. याठिकाणी प्रत्येक दुसरा व्यक्ती सापाच्या संगोपनाचं काम करतो. या गावातील लोकांची मैत्री किंग कोब्रा आणि वायपरसारख्या सापांची आहे. सापांच्या शेतीसाठी जगभरात चीनमधील हे गाव प्रसिद्ध आहे. स्नेक फार्मिंग म्हणून याठिकाणी साप पाळले जातात. जिसिकियाओमध्ये वेगवेगळ्या सापांच्या प्रजाती आणि त्यांचे संगोपन केले जाते, यात किंग कोब्रा, अजगर, विषारी वायपरसारखे अनेक साप असतात. याठिकाणचे लोक सापांच्या अंगाला बाजारात विकून नफा कमवतात, चीनमध्ये सापांच्या मांसाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या गावात सापांची शेती केली जाते. सापाचे विष विकूनही येथील लोक चांगली कमाई करतात. हे विषारी साप गावकऱ्यांसाठी सामान्य आहेत, सापांचे मांस विकून ते आपला उदरनिर्वाह करतात, त्यासोबत साप हे त्यांच्यासाठी अन्न आहे. या गावातील लोक फक्त फाइव स्टेप सापाला भीतात, कारण हा साप चावला तर पाच पावलांवर जाताच चावा घेतलेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. चीनमध्ये सापांच्या मांसाला जास्त किंमत मिळते, त्यासाठी हे लोक सापांची शेती करुन पोट भरतात, ते सहजपणे विषारी सापांसोबत काम करताना दिसतात. टॅग्स :चीनसापchinasnake