ज्ञानाचं मंदिर! देवेंद्र फडणवीस पुस्तकांच्या घराला भेट देतात तेव्हा... By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:43 PM 2021-12-03T13:43:52+5:30 2021-12-03T14:30:30+5:30
केंद्रीयमंत्री कपिल पाटील आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासमेवत फडणवीस यांनी या लायब्ररीला भेट दिली. त्यावेळी, ग्रंथालयाकडून त्यांना पुस्तक भेट देण्यात आले. विधानसभा विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे कुशाग्र बुद्धीमत्तेचे आहेत. कायद्याचे पदवीधर असलेले फडणवीस एक पुस्तकप्रेमीही आहेत.
विविध पुस्तकांचे वाचन आणि घडामोडींचं बारकाईनं निरीक्षण ते करत असतात. त्यातूनच मीडियाशी संवाद साधताना ते अनेक संदर्भ देऊन भाष्य करतात.
फडणवीस यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांचं वाचनही भरपूर आहे. म्हणूनच ते विरोधकांच्या प्रश्नाला, टीकेला जशास तसं उत्तर देतात.
फडणवीस यांनी नुकतेच डोंबिवली येथील पाईस् फ्रेंड्स लायब्ररीला भेट दिली. या लायब्ररी भेटीचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंवरुन शेअर केले आहेत.
पुस्तकांच्या अवतीभोवती राहून खूप भारी वाटलं. पण मला येथे अधिक वेळ व्यतीत करायची इच्छा होती, असे फडणवीस यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. तसेच, या लायब्ररीला त्यांनी ज्ञानाचं मंदिर... असं संबोधलंय.
केंद्रीयमंत्री कपिल पाटील आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासमेवत फडणवीस यांनी या लायब्ररीला भेट दिली. त्यावेळी, ग्रंथालयाकडून त्यांना पुस्तक भेट देण्यात आले.
फडणवीस यांनी या लायब्ररीच्या भेटीत अनेक पुस्तके चाळली. तर, बालपणीच्या आठवणी जागवणारं चंपक हे पुस्तकही त्यांनी हातात घेतल्याचं एका फोटोत दिसत आहेत.
फडणवीस यांनी पुस्तकाच्या घराला भेट दिल्यानंतर हे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियातून भाजप कार्यकर्त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत.