Ajay Devgan-Kajol Jodi Kolhapur
अजय देवगण-काजोल जोडी कोल्हापूरात By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 05:05 PM2018-03-20T17:05:02+5:302018-03-20T17:55:46+5:30Join usJoin usNext श्री एकमुखी दत्त मंदिराच्या कलशारोहण सोहळ््यात भाग घेण्यासाठी मंगळवारी अभिनेता अजय देवगण कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी परिसरात दाखल झाला. (छाया : आदित्य वेल्हाळ) श्री एकमुखी दत्त मंदिराच्या कलशारोहण सोहळ््यात भाग घेण्यासाठी मंगळवारी अभिनेता अजय देवगण कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी परिसरात दाखल झाला. सोबत अभिनेत्री काजोल होती. (छाया : आदित्य वेल्हाळ) साडेबाराच्या दरम्यान अभिनेता अजय व काजोल यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ) मिरजकर तिकटी येथील श्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता लघुरुद्र अभिषेक, अकरा वाजता पुण्यहवाचन व अष्टगंध मार्चन दत्तमहायाग विधी झाले. मंदिर कलशारोहण सोहळ््यात अभिनेता अजय व काजोल देवगण यांनी होमहवन आणि कलशपूजन विधी केले. (छाया : आदित्य वेल्हाळ) मिरजकर तिकटी येथील श्री एकमुखी दत्त आखाडा सेवाभावी संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजता लघुरुद्र अभिषेक, अकरा वाजता पुण्यहवाचन व अष्टगंध मार्चन दत्तमहायाग विधी झाले. मंदिर कलशारोहण सोहळ््यात अभिनेता अजय व काजोल देवगण यांनी होमहवन आणि कलशपूजन विधी केले. (छाया : आदित्य वेल्हाळ) अजय आणि काजोल यांची अंबाबाईवर नितांत श्रद्धा आहे. वर्षातून एकदा तरी ते देवीच्या दर्शनासाठी येतात. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी थेट अंबाबाई मंदिर गाठले. (छाया : आदित्य वेल्हाळ) अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी समितीच्यावतीने अंबाबाईची प्रतिमा देऊन अभिनेता अजय व काजोल देवगण यांचा सत्कार केला. यावेळी किरण नकाते, सदस्या संगीता खाडे, ऋतुराज संजय पाटील आदी उपस्थित होते. अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी समितीच्यावतीने देवीची साडी देऊन अभिनेता अजय व काजोल देवगण यांचा सत्कार केला. यावेळी किरण नकाते, सदस्या संगीता खाडे, ऋतुराज संजय पाटील आदी उपस्थित होते. टॅग्स :अजय देवगणकाजोलकोल्हापूरAjay DevgnKajolkolhapur