Heavy flood in panchganga river of kolhapur
पंच'गंगा'माई पाहुणी आली गेली घरट्यात राहुन... By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 05:27 PM2019-08-08T17:27:36+5:302019-08-08T17:45:33+5:30Join usJoin usNext कोल्हापुरातील पूरग्रस्त भागात स्थानिकांसह एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे. नागिरकांना धैर्य देण्याचं कामही जवानांकडून होत आहे. आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड, एनडीआरएफ आणि पोलीस यांच्याकडून पूरग्रस्तांची मदत सुरु आहे. पंजाब, ओडिसा, गोवा, गुजरात अशा अनेक ठिकाणाहून बचाव पथके बोलावली आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका बसला आहे. तर हजारो कुटुंब स्थलांतरीत झाले आहेत. पुरात अडकलेल्या सर्वांना सुखरुप काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एअरलिफ्टिंग करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. सध्या खासगी, कोस्टगार्ड, नौदल एनडीआरएफच्या एकूण 60 बोटी सध्या कार्यरत आहेत. कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले आहे. कोल्हापुरातील पूरस्थितीचे हवाईचित्रण केलेली दृश्ये काळजाला हात घालतात. चोहोबाजुंनी पाण्यानं वेढलंल गाव पाहाताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरस्थितीचे हवाई सर्वेक्षण आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या ठिकाणांना भेट दिली. मुख्यमंत्र्यांसह कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदांमत्री गिरीश महाजन यांनीही कोल्हापूरचा पाहणी दौरा केला. राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाणार असून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत करण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पूरस्थितीचा आढावा घेत, बचावकार्य आणि मदत वेगाने पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी शैलेजा पाटील पुराचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी जेवनाची व्यवस्था करत आहेत. त्यासाठी त्यांनी खुद्द स्वयंपाकगृहाची सुत्रे हाती घेतली आहेत. पुढील तीन दिवस कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सैन्यदल तळ ठोकून या जिल्ह्यात मदत आणि बचावकार्य करत आहे.टॅग्स :पूरदेवेंद्र फडणवीसकोल्हापूरfloodDevendra Fadnaviskolhapur