कोल्हापूरच्या महापुराची भीषणता; काळजात धडकी भरवणारे फोटो! By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 11:37 AM 2019-08-08T11:37:00+5:30 2019-08-08T11:43:36+5:30
गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील २0४ गावे पंचगंगा नदीच्या महापुरात अडकली आहेत. लष्कराच्या मदतीने ६0 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले असले, तरी करवीर तालुक्यातील चिखली गावांत २ हजार लोक अडकले आहेत. (Photo Credit - www.vamphotostudio.com)
लष्कर, नौदल, एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुमारे ९४ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने पुणे-बंगळुरु महामार्ग ठप्प झाला आहे.
पंचगंगेची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.४ फूट होती. ती धोक्याच्या पातळीपेक्षा तब्बल १३ फुटांवरून वाहू लागल्याने अक्षरश: जलप्रलय झाला आहे.(Photo Credit - www.vamphotostudio.com)
कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर पाणी भरल्याने अक्षरश: बोटीमधून लोकांना प्रवास करावा लागत आहे.
पुणे-बंगळुरुच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. (Photo Credit - www.vamphotostudio.com)