नाताळनिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठ सजली, चर्च विद्युत रोषणाईंनी उजळले
By संदीप आडनाईक | Updated: December 24, 2022 18:29 IST2022-12-24T18:02:07+5:302022-12-24T18:29:49+5:30
ख्रिस्त जन्मोत्सवाचा नाताळ सण उद्या, रविवारी जगभर साजरा होत आहे. केक, मिठाईपासून ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाशदिवे, छोटे सांताक्लॉज, सांताच्या टोप्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. शहरातील विविध चर्चवरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिस्त जन्मोत्सव आणि नूतन वर्षारंभाचे विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. (छाया : नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ)

कोल्हापुरात नाताळनिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. दुकानांमध्ये सांताक्लॉजच्या वेशातील विविध खेळणी लहान मुलामुलींना आकर्षित करत आहेत.
सांताक्लॉजच्या जीवनावर आधारीत देखावा बघण्यात चिमुकली मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते
रेसिडेन्सी क्लबशेजारील सर्वांत जुन्या ऑल सेंटस चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई
नागाळा पार्क येथील ख्राइस्ट चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे
होलिक्रॉस शाळेच्या आवारातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चमधील मदर मेरीची प्रतिमा विद्युत रोषणाईत झळकत आहे
नागाळा पार्क येथील होलिक्रॉस शाळेच्या आवारातील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चवर नयनरम्य विद्युत रोषणाई
वायल्डर मेमोरियल चर्चवर मनमोहक, आकर्षक विद्युत रोषणाई