कोल्हापुरातील कळंबा परिसरात बर्ड्स ऑफ कोल्हापूरमार्फत पक्षिगणनेत १०१ जातीच्या १०३४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून, यामध्ये वीस स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. धोकापातळीजवळील वर्गवारीतील इंडियन रिव्हर टर्न, पैंटेड स्टोर्क तसेच असुरक्षित यादीमध्ये असणारा टाॅनी इगल, ब्लॅक बेलीड टर्न, वूली नेक स्टोर्क या पक्ष्यांचीही नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील बर्ड्स ऑफ कोल्हापूर या संस्थेमार्फत गेल्या दोन वर्षांपासून पक्षिगणना घेण्यात येते. (छाया - प्रणव देसाई)