पती-पत्नीच्या हळूवार नात्याची वीण, सौभाग्यवतींनी केले वडाच्या झाडाचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 07:18 PM2018-06-27T19:18:07+5:302018-06-27T19:29:26+5:30

पती-पत्नीच्या हळूवार नात्याची वीण अधिक घट्ट करणारी वटपौर्णिमा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यानिमित्त कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या रामाचा पार येथे सौभाग्यवतींनी वडाच्या झाडाचे पूजन केले. (छाया : नसीर अत्तार)

सुवासिनींनी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर, मिरजकर तिकटी, वटेश्वर यासह विविध ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाचे पूजन केले व अखंड सौभाग्य व सुख,समृद्धीची कामना केला.(छाया : नसीर अत्तार)

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील रामाचा पार येथील वडाच्या पूजनासाठी महिलांची मोठी गर्दी होती. नवविवाहितांनी पुरोहीतकडून पूजन करवून घेतले. .(छाया : नसीर अत्तार)

बुधवारी पावसानेही विश्रांती घेतल्याने महिला भरजरी काठापदराच्या साड्या,सौभाग्यालंकार असलेल्या मंगळसुत्रासह दागिने, केसात गजरा असा साजश्रूंगार करून परिसरातील वड पूजनासाठी बाहेर पडल्या. .(छाया : नसीर अत्तार)

एकाचवेळी पारावर गर्दी होवू नये यासाठी देवस्थान समितीच्यावतीने बॅरिकेटिंग करण्यात आले होते. .(छाया : नसीर अत्तार)

कोल्हापुरातील मिरजकर तिकटी, वटेश्वर, उत्तरेश्वर पेठ, गंगावेश, शाहुपूरी, राजारामपूरी, शाहू उद्यान यासह उपनगरातील वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी महिलांची गर्दी दिसत होती. सायंकाळपर्यंत सजलेल्या महिला हातात पूजेचे ताट घेवून जात असल्याचे चित्र होते. .(छाया : नसीर अत्तार)