धोकादायक आहे #10YearChallenge, जाणून घ्या दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 07:33 PM2019-01-20T19:33:53+5:302019-01-20T19:40:52+5:30

​1. #10YearChallengeचा हा आहे धोका - सोशल मीडियावर सध्या #10YearChallenge या ट्रेंडनं धुमाकूळ घातला आहे. कित्येकांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम वॉल याच चॅलेंजनं भरलेल्या दिसत आहेत. या चॅलेंजनुसार लोक आपला 10 वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो कोलाज करुन टाइमलाइनवर शेअर करत आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या राहणीमानमध्ये किती आणि कसा बदल झाला आहे, याची माहिती लोक या चॅलेंजद्वारे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पण #10YearChallenge चॅलेंज प्रचंड धोकादायक आहे, याची तुम्हाला माहिती आहे का? हे चॅलेंज कसं धोकादायक आहे, हे जाणून घेऊया

2. मानसिक आरोग्यासाठी हानिकारक - बर्डबॉक्स, किकी किंवा मोमो चॅलेंजप्रमाणेच #10YearChallengeदेखील मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक आहे. मोमो चॅलेंज आणि किकीसारख्या धोकादायक गेम्सवर बंदीदेखील आणण्यात आली. त्याचप्रमाणे #10YearChallenge आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.

3. सेलिब्रिटींनी #10YearChallenge ची लागण सर्वसामान्य नागरिकांसहीत सेलिब्रिटीही #10YearChallenge स्वीकारत आहेत. सेलिब्रिटीही सोशल मीडियावर आपापले 10 वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो शेअर करत आहेत.

4. फियर ऑफ मिसिंग आउट - या चॅलेंजमुळे FOMO म्हणजे फियर ऑफ मिसिंग आऊटचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे एखाद्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी न झाल्यास तुम्हाला काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखे वाटते, यालाच फियर ऑफ मिसिंग आऊट असे म्हणतात. अशा पद्घतीच्या तणावामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

5. चॅलेंजला बळी पडू नका - अशा प्रकारचे चॅलेंज लोकांनी केवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादित ठेवावीत. या चॅलेंजचा आपल्यावर वाईट प्रभाव होता कामा नये, किंवा अशा गेम्सच्या आहारी जाऊ नये, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्यामध्ये किती बदल झाला आहे, हे पाहणं वाईट बाब नाहीय. पण, वयोमानानुसार आपल्या बदल घडणं हीदेखील नैसर्गिक प्रक्रिया आहे, हेदेखील समजून घेणे महत्त्वाचे आहे.