आयुष्यात 'या' साहसी गोष्टी एकदा तरी नक्की करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 17:24 IST2018-08-24T16:38:19+5:302018-08-24T17:24:39+5:30

आयुष्यात प्रत्येकाचीच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. अनेकांना अॅडव्हेंचर्स गोष्टी खुणावत असतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या आयुष्यात एकदा तरी योग्य ती काळजी घेऊन नक्की करा.
पाण्याखालचं सुंदर जग, जैव विविधता अनुभवायची असेल तर स्कूबा डायव्हिंग हा उत्तम पर्याय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणनजिकच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी स्कुबा डायव्हिंग करता येतं.
पॅरासेलिंगच्या बोटीवर लाईफ जॅकेट घालून पॅरासेलिंगचा थरार सुरुवातीला भीतीदायक वाटतो. मात्र पक्ष्याप्रमाणे गगनात स्वच्छंदी फेरफटका मारून परत आल्यानंतरचे एक अदभूत आनंद मिळतो.
बंजी जम्पिंग हा प्रकार ऐकूनच अनेकांच्या पोटात गोळा येतो. मात्र उंचावरून खाली कोसळताना नेमकं कसं वाटतं याचा अनुभव घ्यायचा असेल तर बंजी जम्पिंग नक्की करा.
समुद्रातील लाटांवर स्वार होण्याचा आनंद लुटायचा असेल तर विंडसर्फिंग करायला हवं. परदेशात आणि देशात अनेक ठिकाणी विंडसर्फिंग करता येतं.