candies that will take you back to your childhood
'हे' चॉकलेट्स जागवतील बालपणीच्या आठवणी By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 04:06 PM2018-08-10T16:06:35+5:302018-08-10T16:47:40+5:30Join usJoin usNext चॉकलेट ही सर्वांच्याच आवडीची गोष्ट. हल्ली 1 रुपयांपासून ते अगदी 1000 रुपयांपेक्षाही जास्त किंमतीची चॉकलेट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र अशी काही चॉकलेट्स आहेत ज्यांना पाहिल्यावर बालपणींच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळेल. मॅगो बाईट हे चॉकलेट आताही साधारण 1 रुपयाला बाजारात मिळते. मात्र एक काळ असा होता जेव्हा फक्त बेस्ट फ्रेंडलाच हे चॉकलेट दिले जात असे. किसमी या चॉकलेटची क्रेझ आताही प्रचंड आहे. सुरुवातीला 25 पैशाला मिळणार हे चॉकलेट आता एक रुपयाला मिळतं. पान पसंद या चॉकलेटला गोड पानाची चव असल्याने पान खाण्याऐवजी अनेकजण आताही हे चॉकलेट खाणं अधिक पसंत करतात. रोला-ए-कोला ही गोळी कोको कोला या सॉफ्ट ड्रिंकसारखी लागत असल्याने सगळ्यांनाच आवडायची. पॉपीन्स या नावातच सगळी गंमत होती. टीव्हीवर येणारी पॉपीन्सची जाहिरात आजही सर्वांच्या लक्षात आहे. वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या लहान मुलांना प्रचंड आवडायच्या. बीग बबूलची जाहिरात तर कोणीच विसरू शकत नाही. एक काळ असा होता की प्रत्येकालाच हे चॉकलेट हवं असायचं. पेप्सी ही सर्वच लहान मुलांच्या अत्यंत आवडीची गोष्ट. पेप्सीचा थंडावा आणि वेगवेगळे रंग हे लहान मुलांचं लक्ष वेधून घेतात.