जुन्या शिडीचा वापर करून असं सजवा घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:00 IST2019-08-22T14:54:36+5:302019-08-22T15:00:55+5:30

घरं सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सुंदर आणि हटके गोष्टींच्या मदतीने घर आकर्षकरित्या सजवलं जातं.

घरामध्ये अशा अनेक वस्तू असतात ज्याचा वापर आपण त्या जुन्या झाल्या असल्यामुळे करत नाही. मात्र याच वस्तूंचा वापर हा टाकाऊपासून टिकाऊ पद्धतीने नक्कीच करता येतो.

अनेकांच्या घरामध्ये एखादी जुनी शिडी असते. मात्र त्याचा वापर फारसा केला जात नाही. अशा शिडीला नवीन रंग देऊन भन्नाट वेगळा असा लूक देता येईल.

शिडीचा अशापद्धतीने वापर केल्यास नवीन वस्तू घेण्याऐवजी पैशाची देखील बचत होईल. तसेच घरही सुंदररित्या सजवलं जाईल.

शिडीला मस्त रंगीबेरंगी रंग लावून त्याचा वापर हा छोट्या वस्तू ठेवण्यासाठी करता येतो.

शिडीचा वापर करून मिनी इंडोर गार्डन तयार करता येईल.

लिव्हिंग रूमला स्टायलिश लूक देण्यासाठी शिडीचा वापर करता येईल.

अँटिक वस्तू ठेवण्यासाठी स्टँडप्रमाणे शिडीचा वापर करता येईल.

शिडीचा वापर करून तुम्ही एक छानसं बूक शेल्फही तयार करू शकता.

किचनमधील सामान स्टोर करून ठेवण्यासाठी शिडीचा वापर करता येईल.

कपडे आणि शूज ठेवण्यासाठी देखील शिडीचा वापर करता येईल.

टॅग्स :घरHome