Diwali 2018 different and unique diwali decoration ideas
Diwali 2018 : यंदाच्या दिवाळीत असं सजवा आपलं घर By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:12 PM2018-11-05T16:12:29+5:302018-11-05T16:42:26+5:30Join usJoin usNext दिवाळी हा आनंदाचा सण. प्रत्येकाच्या घरात फराळ, रांगोळ्या, सजावटीची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाच्या दिवाळीला तुम्ही हटके पद्धतीने घराची आकर्षक सजावट करू शकता. दिवाळीत घर कसं सजवायचं हे जाणून घेऊया. दिवाळीत फुलांनी केलेली सजावट ही विशेष लक्ष वेधून घेते. आपण दारावर रंगीबेरंगी फुलांचे सुंदर तोरण लावू शकतो. तसेच घरामध्ये फुलांच्या माळा लावून घर सुंदररीत्या सजवू शकतो. घराबाहेर काढलेली सुंदर रांगोळी घराची शोभा वाढवते. वेगवेगळ्या रंगांची, फुलांची रांगोळी ही प्रामुख्याने दिवाळीत काढली जाते. रांगोळीचा साचा किंवा छापा वापरून सध्या झटपट रांगोळी काढता येते. दिवाळी हा खऱ्या अर्थाने दिव्यांचा सण. दिव्यांनी आपण आपलं घर उजळवतो. बाजारात आकर्षक पणत्या उपलब्ध आहेत. तसेच फ्लोटींग कॅन्डलचा वापर करू शकतो. दिवाळी आली का प्रत्येकाच्या घरी सुंदर आकाश कंदील पाहायला मिळतात. विविध प्रकारच्या आकर्षक आकाश कंदीलांना विशेष मागणी आहे. घराच्या घरीही तुम्ही सुंदर आकाश कंदील तयार करू शकता. दिवाळीत देवघराची सजावट केल्याने मन प्रसन्न होते. फुलं, रांगोळी, तोरण, दिवे, पणती या सर्व गोष्टीचा वापर करून हवी तशी सजावट करता येते. दिवाळीत प्रत्येकाच्या घराला किंवा इमारतीला आवर्जून आकर्षक विद्यूत रोषणाई केली जाते. इलेक्ट्रिक लाईट्सचा वापर करून सजावट केल्यास घर अत्यंत सुंदर दिसते. बाजारात लाईट्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.टॅग्स :दिवाळीDiwali