diwali special home decoration with rangoli
दिवाळीत दिव्यांसोबत सुंदर रांगोळीने असं सजवा घर By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:02 PM2018-11-01T15:02:51+5:302018-11-01T16:17:32+5:30Join usJoin usNext दिवाळी हा दिव्यांचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सण. दिवाळीला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे घरोघरी फराळ आणि सजावटीसाठी लगबग सुरू झाली आहे. दिवाळीत घराबाहेर काढलेली रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक रांगोळी कशी काढावी हे जाणून घेऊया. सण, समारंभांना फुलांची सुंदर रांगोळी आवर्जून काढली जाते. यामध्ये सुरुवातीला खडूच्या मदतीने हवी असलेली डिझाईन काढून घ्यावी. त्यानंतर आपल्याला हवी असलेली रंगीबेरंगी फुलांचा त्यामध्ये वापर करावा. अनेक ठिकाणी फुलांची रांगोळी काढण्यात येते. रांगोळी काढता येत नाही अशा महिलांसाठी रांगोळी साचा अथवा रांगोळीचा छापा अत्यंत उपयुक्त आहे. या साच्याच्या मदतीने सुंदर रंग भरून झटपट रांगोळी काढता येते. तसेच या रांगोळीसोबत घर आकर्षक करण्यासाठी दिव्यांचा वापर करता येतो. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना तांदूळ वापरले जातात. तांदळाच्या साहाय्याने आकर्षक रांगोळी काढता येते. रंगीबेरंगी तांदूळ हवे असल्यास हळद, कुंकू अथवा विविध रंगामध्ये तांदूळ भिजवून ते तयार करता येतात. या तांदळाच्या मदतीने सुंदर रांगोळी काढता येते. रांगोळीमध्ये नावीन्य आणून ती अधिक आकर्षक करायची असल्यास कुंदन वापरू शकतो. कुंदनचा वापर करून काढलेली रांगोळी ही मनमोहक असते. सध्या कुंदन रांगोळी मोठ्या प्रमाणात काढली जाते. रांगोळी ही विविध रंगामुळे अधिकच सुंदर होते. आता बाजारात विविध रंग अगदी सहज उपलब्ध होतात. मात्र पूर्वी लोक पीठ, हळद, कुंकू यांचा वापर करून रांगोळी काढत असत. अशा पद्धतीने काढलेली रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेते. रांगोळीसाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांच्यासाठी रांगोळीचे स्टिकर हा बेस्ट पर्याय आहे. घराबाहेर अथवा आतमध्ये जिथे तुम्हाला हवे तिथे तुम्ही रांगोळीचे स्टिकर चिटकवू शकता. टॅग्स :दिवाळीरांगोळीDiwalirangoli