do you want to make changes in yourself, try these simple things
एका महिन्यात स्वतःमध्ये बदल घडवायचाय?... या गोष्टी करून पाहाच! By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 06:23 PM2018-01-29T18:23:35+5:302018-01-29T18:35:05+5:30Join usJoin usNext बोलण्यावर नियंत्रण ठेवा. समोरच्याला दुखावतील असे शब्द टाळा. नम्रपणे बोला. 'प्रसंगी अखंडित वाचित जावे', असं रामदास स्वामींनी म्हटलंय. त्यांचा हा उपदेश पाळा. तुमच्या आवडीचं काहीही वाचा, पण रोज काहीतरी वाचा! आपल्या पालकांशी कधीही उद्धटपणे बोलणार नाही, असा मनाशी निश्चय करा. निसर्ग बरंच काही शिकवत असतो. रोज त्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. अहंकाराचा वारा लागू देऊ नका. सतत काहीतरी शिकत राहा. प्रश्न विचारायला लाजू नका. जो प्रश्न विचारत नाही, शंकानिरसन करून घेत नाही, तो कायमच अज्ञानी राहतो. आयुष्यात जे काम कराल ते झोकून देऊन करा. नकारात्मकता निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून दोन हात दूरच राहा. स्वतःची कुणाशीही तुलना करू नका. अन्यथा तुम्हाला तुमची ताकद कधीच कळणार नाही. प्रयत्न करणं थांबवणं हे सगळ्यात मोठं अपयश आहे, हे पक्कं लक्षात ठेवा. सतत तक्रारी करत, कुरकुरत बसू नका. दिवसाचं नियोजन करा. त्यात काही मिनिटं जातील, पण दिवस सत्कारणी लागेल. रोज काही मिनिटं स्वतःसाठी आणि फक्त स्वतःसाठी राखून ठेवा. छंद जोपासा. एक महिनाभर बाहेरचं खाणार नाही, असा पण करा. पौष्टिक खा, फिट्ट राहा. आयुष्य छोटं आहे. ते गुंतागुंतीचं करू नका. हसायला विसरू नका. टॅग्स :आर्ट आॅफ लिव्हिंगArt of Living