follow these simple tips to stay happy in office
ऑफिसमध्ये आनंदी राहायचंय? 'या' टिप्स फॉलो करा By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 11:10 PM2019-04-12T23:10:41+5:302019-04-12T23:13:19+5:30Join usJoin usNext सहकाऱ्यांना कनेक्ट व्हा- ऑफिसमध्ये तुम्ही टीम म्हणून काम करता. तुम्ही एकटे कधीही एकटे एखादं काम पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे केवळ प्रोफेशनल नातं जपण्यापेक्षा सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा. स्वत:च्या खासगी समस्या दूर ठेवा- प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात. कुटुंब, मित्र परिवार, नातेसंबंधांमध्ये अडचणी येत असतात. याचा परिणाम तुमच्या कामावर होणार नाही, याची काळजी घ्या. टाळाटाळ करू नका- काम करताना उद्यावर जास्त अवलंबून राहू नका. कामात टाळाटाळ करू नका. ऑफिसमध्ये आनंदी राहायचं असल्यास ते उद्यावर ढकलत राहू नका. सकारात्मक वृत्ती ठेवा- सकारात्मक वृत्ती ठेवल्याचा मोठा फायदा तुम्हाला ऑफिसमध्ये होईल. यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये आनंदी राहू शकाल. वाद टाळा- टीमसोबत काम करणं आव्हानात्मक असतं. कारण विविध स्वभावाच्या व्यक्तींना सांभाळून काम करणं सोपं नसतं. त्यामुळे संवाद ठेवा. वाद टाळा. सर्वांची मतं विचारात घ्या. निर्णय घेताना सर्वांच्या मतांचा विचार करा. नवी आव्हानं स्वीकारा- नवीन आव्हानं स्वीकारण्यापासून मागे हटू नका. जिथे नवी आव्हानं स्वीकारायला मिळतात, अशाच ठिकाणी काम करा. त्यामुळे तुम्ही प्रगल्भ होता.