How many hours do Indian people work and how many hours do they sleep View survey statistics here
भारतीय लोक किती तास काम अन् किती तास झोप घेतात? पाहा सर्वेक्षणातील आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 04:55 PM2024-05-19T16:55:51+5:302024-05-19T17:09:14+5:30Join usJoin usNext आपण दिवसातील सर्वात जास्त वेळ कुठे खर्च करतो? दिवसातील २४ तासांपैकी कोणाचा वेळ कुठे जातो हे ज्याचे त्याचे राहणीमान ठरवत असते. वेळ असला की सवड मिळतेच, हे आपण अनेकदा ऐकतो. त्यानुसार अनेक जण त्यांच्या दिवसभरातील वेळेचे नियोजन करतात. दिवसातील १४४० मिनिटांपैकी एखादी व्यक्ती कोणत्या गोष्टीला किती वेळ देते, त्याबाबत जगातील प्रमुख देशांतील १५ ते ६४ वयोगटांतील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, भारतीय लोक सरासरी ५ तास काम करतात, तर ८ ते ९ तास झोप घेतात. (सर्व आकडे मिनिटांमध्ये) (स्रोत: अवर वर्ल्ड इन डेटा)चीन नोकरी - ३१५ मिनिटे, घरची कामे -१२३ मिनिटे, छंद - २२८ मिनिटे आणि झोप - ५४२ मिनिटे.भारत नोकरी - २७२ मिनिटे, घरची कामे - १६० मिनिटे, आवड किंवा छंद - २५३ मिनिटे आणि झोप - ५२८ मिनिटे.दक्षिण कोरिया नोकरी - २८८ मिनिटे, घरची कामे - ८९ मिनिटे, छंद - २५८ मिनिटे आणि झोप - ४७१ मिनिटे. अमेरिका नोकरी - २५१ मिनिटे, घरची कामे - १२२ मिनिटे, छंद - ५२८ मिनिटे आणि झोप - ५२८ मिनिटे.इंग्लंड नोकरी - २३५ मिनिटे, घरची कामे - १३३ मिनिटे, छंद - ३०५ मिनिटे आणि झोप - ५०८ मिनिटे. टॅग्स :भारतअमेरिकालाइफस्टाइलIndiaAmericaLifestyle