raksha bandhan 2018 gifts for your sister
रक्षाबंधनाला बहिणीला द्या 'या' खास भेटवस्तू By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:57 PM2018-08-22T15:57:51+5:302018-08-22T16:11:24+5:30Join usJoin usNext भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे बहिणीला खूश करण्यासाठी तुम्ही काय काय भेटवस्तू देऊ शकता ते जाणून घेऊया. रक्षाबंधनाला बहिणीला काय भेटवस्तू द्यायची हा सगळ्याच भावांना पडणारा मोठा प्रश्न असतो. मात्र वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या बहिणीला एक छान घड्याळ भेट म्हणून देऊ शकता. मुलींना नटायला खूप आवडतं त्यामुळे बहिणीला मेकअप किट गिफ्ट देण्याचा उत्तम पर्याय आहे. पर्स ही प्रत्येक मुलीच्या आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एखादी छानशी हँड बॅग रक्षाबंधनासाठी बहिणीला देण्याचा विचार करू शकता. गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडतं त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला इअरफोन गिफ्ट करू शकता. स्वत: जवळ कितीही कपडे असले तरी प्रत्येक मुलीला ते कमीच वाटत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीसाठी सुंदर ड्रेस घेऊ शकता. रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही एखादी सोन्याची भेटवस्तू देऊ शकता.टॅग्स :रक्षाबंधनभारतीय सणRaksha BandhanIndian Festivals