in such cases there is one thought of boys and girls
मुला-मुलींचे 'या' गोष्टींमध्ये विचार असतात एकसारखेच By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:14 PM2018-11-07T17:14:00+5:302018-11-07T17:19:21+5:30Join usJoin usNext 1. मित्रांसोबत मज्जा-मस्ती करणं : मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करणं, वेळ घालवणं, मज्जा-मस्ती करणं आवडते. निरनिराळ्या पद्धतीनं आपापल्या मित्र-मैत्रिणींसोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करणं त्यांना पसंत असते. 2. दादा-ताई बोललं नापसंत : जिथे मुलांना काका, दादा म्हणून हाक मारलेली आवडत नाही, तसंच मुलींनाही काकी, ताई अशी हाक मारलेली अजिबात चालत नाही. 3. हवं असतं खरं प्रेम : प्रेमाकडे पाहण्याची सर्वांची दृष्टी वेगळी असली तरी मुलं-मुली खऱ्या प्रेमाच्याच शोधात असतात. या प्रकरणात दोघाचांही विचार अगदी सारखाच असतो. 4. भावूक स्वभाव : मुलं भलेही आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करतात, मात्र मुलींप्रमाणे काही मुलंदेखील भावूक असतात. आपल्या भावना कोणाही व्यक्तीसमोर व्यक्त करणं मुलांना आवडत नाही. 5. करिअरसंबंधी खूप स्वप्न असतात : ज्याप्रमाणे मुलं आपल्या करिअरला प्राधान्य देतात, त्याचप्रमाणे मुलींनाही करिअरमध्ये यशाची शिखर सर करण्याची अनेक स्वप्न असतात. करिअरसंबंधी दोघांचीही भरपूर स्वप्न असतात आणि ही स्वप्न त्यांना सत्यातही उतरवायची असतात. 6.मुलंही करतात गॉसिप : मुलंही प्रचंड प्रमाणात गॉसिप करतात. मुलांना गॉसिप करायला खूप आवडतं. पण मुलं ही गोष्ट मान्य करत नाहीत. 7. चूक मान्य नसणे - काही मुलामुलींना स्वतःच्या चुका मान्य नसतात. ही सवय दोघांमध्ये असते.