ऑफिसमध्ये कधीही करू नका 'या' चुका; होईल पश्चाताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 23:03 IST2020-01-22T22:53:15+5:302020-01-22T23:03:54+5:30

तुमच्या सहकाऱ्यांच्या पाठीमागून काहीही बोलू नका. यामुळे तुमची अतिशय चुकीची प्रतिमा ऑफिसमध्ये निर्माण होते.
बॉससमोर उगाच पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या क्षमतेच्या जोरावर यश मिळवा. याचा फायदा दीर्घकालीन असेल.
अतिशय उग्र वासाचे पदार्थ ऑफिसमध्ये खाणं टाळा.
ऑफिसच्या कामात प्रॅक्टिकल राहा. तिथे उगाच इमोशनल होऊ नका.
ऑफिसमध्ये गॉसिप करणं टाळा.
तुमचं काम पूर्णपणे झोकून देऊन कर. त्यात हलगर्जीपणा, टाळाटाळ करू नका.
ऑफिसमध्ये नकारात्मकता पसरवू नका आणि नकारात्मकता पसरवणाऱ्यांपासून लांब राहा.
शक्य होईल तितक्याच कामाबद्दल बोला. तेवढ्याच कामाचं आश्वासन द्या. अवास्तव गोष्टींबद्दल आश्वासन देऊ नका.