ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 06:07 PM2024-12-11T18:07:25+5:302024-12-11T18:13:43+5:30

ST Bus News: एखाद्या बसचा दुर्दैवाने अपघात झाल्यास त्यातील जखमी प्रवासी अथवा मृतांच्या वारसांना या निधीतून साहाय्य दिले जाते.

एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हिंदुहृदयसम्राट शासनामार्फत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना राबवली जाते.

या योजनेंतर्गत अपघातामध्ये मृत व जखमी प्रवाशांना नुकसानभरपाई दिली जाते. त्याकरिता प्रती प्रवासी एक रुपया रक्कम प्रवास भाडे व्यतिरिक्त विमा रक्कम वसूल केली जाते.

जमा केलेली ही रक्कम महामंडळाच्या अपघात साहाय्यता निधीमध्ये वर्ग केली जाते.

एखाद्या बसचा दुर्दैवाने अपघात झाल्यास त्यातील जखमी प्रवासी अथवा मृतांच्या वारसांना या निधीतून साहाय्य दिले जाते.

नुकसानभरपाईच्या बाबतीत असे धोरण स्वीकारले जाणारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे भारतातील पहिले महामंडळ आहे.

प्रवाशाला कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास १ ते अडीच लाख रुपये आणि मृत्यू झाल्यास कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत केली जाते.

एस.टी. महामंडळ हे सुरक्षित प्रवास करीत आहे. 'सुरक्षित प्रवास' हे महामंडळाचे ब्रीदवाक्य असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रा. प. महामंडळाचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.

प्रवाशांना महामंडळाने एक रुपयात विम्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा एसटीचा प्रवासही सुरक्षित झाला आहे.