18 doors of jayakwadi dams has opened after nine years
जायकवाडी धरणाचे 9 वर्षांनंतर 18 दरवाजे उघडले By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:42 PM2017-09-22T12:42:16+5:302017-09-22T12:50:35+5:30Join usJoin usNext धरणात पाण्याची आवक सव्वा लाख क्युसेक्स इतकी होत आहे. प्रकल्पातून गोदावरी पात्रात प्रारंभी १० हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणाच्या २७ दरवाज्यांपैकी १० ते २७ क्रमांकाचे असे १८ दरवाजे रात्री १२ वा. प्रत्येकी ६ ईंच वर करण्यात आले. धरणाचे १ ते ९ क्रमांकाचे ९ दरवाजे हे आणीबाणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. धरणातून होणारा विसर्ग पाहण्यासाठी लोकांची गर्दी नाथसागराच्या पात्राजवळ जमत आहे