ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २७ - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गाड्यांचा ताफा मुळेगांव तांड्यात प्रवेश केला़ अचानक आलेल्या गाड्यामुळे मुळेगांव तांड्यावर अवैध दारू धंदेवाल्यांची चांगलीच तारांबळ उडाली़ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहरातील तीन तांड्यावर धाड टाकून १७ लाख ९६ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ शिवाय संशयितांच्या घरझडतीत ६ हजार २५० रूपयांची हातभट्टी दारू हस्तगत करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे़ दरम्यान, शनिवार २७ आॅगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा, वडजी तांडा व बक्षीहिप्परगा तांड्यावरील अवैध दारू तयार करणाºया ठिकाणावर धाड टाकली़ या धाडीत जिल्ह्यातील महावितरण, तालुका व शहर पोलीस व अन्य विभागाच्या पथकांनी ही कारवाई केली़ या कारवाईत १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ या कारवाईत १२ लाख ४० हजारांचे रसायन नष्ट करण्यात आले आहे़ यात यात २१५ रिकामे बैरल, १२ लाकडी चाटू, १२ जर्मन पाटील, ११० ररबरी टयुबा शिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत़