aaditya thackeray invites elon musk tesla to maharashtra
जगातील बलाढ्य कंपनी राज्यात येणार? आदित्य ठाकरेंकडून तयारी सुरू By कुणाल गवाणकर | Published: October 23, 2020 05:21 PM2020-10-23T17:21:14+5:302020-10-23T17:25:57+5:30Join usJoin usNext पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी जगप्रसिद्ध कंपनीला महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशदेखील मिळताना दिसत आहे. आदित्य ठाकरेंनी इलॉन मस्क यांना राज्यात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. ठाकरेंच्या आमंत्रणाला मस्क यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इलॉन मस्क इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे संस्थापक आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या संवादाची माहिती आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून दिली आहे. टेस्लाला महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मस्क यांच्यासोबत बातचीत केल्याचं आदित्य ठाकरेंनी ट्विट करून सांगितलं आहे. राज्य सरकार सातत्यानं विकासासाठी काम करत असल्याचं ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या ट्विटला मस्क यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे टेस्ला लवकरच राज्यात येण्याची शक्यता आहे. मस्क यांनी ट्विटसोबत एक टी-शर्टचा फोटोदेखील शेअर केला आहे. त्यावर 'इंडिया वाँट्स टेस्ला' असं लिहिलं आहे. यासोबतच टेस्ला यांनी आभारदेखील मानले आहे. टेस्ला २०२१ मध्ये भारतात दाखल होईल, असे संकेत कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी आधीच दिले आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढवण्याचं धोरण मोदी सरकारकडून आखलं जात आहे. त्यामुळे टेस्लाला भारतात मोठी संधी आहे.Read in Englishटॅग्स :आदित्य ठाकरेAditya Thackrey