भाजपमध्ये जुन्या चेहऱ्यांना पुन्हा येणार अच्छे दिन?; RSS कडून सूचना, विधानसभेपूर्वी हे नेते होणार सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 07:16 PM2024-08-14T19:16:54+5:302024-08-14T19:25:55+5:30

विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यासाठी काल विलेपार्ले इथं भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी भाजपकडून वेगाने पावलं उचलली जात आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवं, याबाबत विचारमंथन करण्यासाठी काल विलेपार्ले इथं भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

काल झालेल्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपला विविध सूचना करण्यात आल्या. त्यामध्ये जुन्या नेत्यांना ताकद देण्याच्या सूचनांचाही समावेश आहे.

या नेत्यांमध्ये माधव भांडारी, राज पुरोहित, प्रकाश मेहता, दिलीप कांबळे या नेत्यांचाही समावेश आहे.

कधीकाळी भाजपमध्ये प्रचंड सक्रिय असलेल्या या नेत्यांना मागील काही महिन्यांपासून बाजूला सारण्यात आल्याचं दिसत आहे.

या नेत्यांना पुन्हा एकदा संघटनेत जबाबदारी देण्यात यावी, असं आरएएस पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आलं आहे.

भाजपच्या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्या या नेत्यांना संधी दिल्याने त्याचा विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, असा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा अंदाज आहे.