प्रदूषणमुक्तीसाठी अभिनेत्री जुही चावला सरसावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 22:17 IST2017-12-10T22:05:35+5:302017-12-10T22:17:13+5:30

चित्रपटसृष्टीपासून अनेक वर्षं काहीशी दूर असलेली अभिनेत्री जुही चावला प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढे सरसावली आहे
मुंबईतल्या लोकांना तिने प्लॅस्टिकमुक्तीचा कानमंत्र दिला.
प्लॅस्टिकमुक्तीसाठी राबवलेल्या जनजागृती रॅलीत जुही चावलासोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबाबत तिने लोकांना माहिती दिली आहे.
जुही चावलासोबत लहानगेही प्लॅस्टिकमुक्तीसाठी जनजागृती करत आहेत. प्लॅस्टिक हे नष्ट करता येत नसल्याचीही माहिती अभिनेत्री जुही चावला हिनं दिली आहे.