सिनेटमधील विजयानंतर शिवसेनाभवनात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 05:44 PM2018-03-29T17:44:52+5:302018-03-29T17:44:52+5:30

शासनाने आखलेल्या नव्या कायद्यानुसार पहिल्यांदाच झालेल्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी दहा जागा शिवसेनेच्या युवा सेनेनं जिंकल्या. त्यानंतर शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या दादर येथील शिवसेना भवनात विजयाचा जल्लोष करण्यात आला.

विजयाचा जल्लोषात सहभागी होण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेनं जिंकायचं ठरवलं तर किती मोठा विजय मिळू शकतो, हे या निवडणुकीतून आम्ही दाखवून दिलंय. त्यामुळे विधानसभेतही आत्तापेक्षा दुप्पट जागा मिळतील, असा विश्वास आदित्य ठाकरे व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे विजयी उमेदवार.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना भवनात उपस्थित राहुन विजेत्यांचे अभिनंदन केले.