नवरी नटली! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर, अंबानींच्या धाकट्या सुनेच्या पारंपरिक थाट By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 02:27 PM 2024-07-12T14:27:29+5:30 2024-07-12T14:41:25+5:30
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाहबंधनात अडकणार आहेत. Anant Ambani-Radhika Merchant Wedding: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाहबंधनात अडकणार आहेत.
त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. हळदी आणि संगीत समारंभानंतर लग्नाच्या पूर्वसंध्येला अंबानींच्या अँटिलीयामध्ये शिवपूजा आणि गरबा नाईटचं आयोजन करण्यात आलं होतं.
यासाठी राधिकाने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. लग्न सोहळ्यातील तिचे काही फोटो समोर आले आहेत.
राधिकाने पांढऱ्या रंगाची गुजराती साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. या पारंपरिक आणि साध्या लूकमध्येही तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं.
गरबा नाईटसाठी खास जांभळ्या रंगाच्या भरजरी लेहेंग्यात राधिका दिसली. तर अनंत अंबानीने गुलाबी रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केला होता.
अंबीनांच्या अँटिलियामधील गरबा नाईटचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अंबानीचं धाकट्या सुनेचा थाट पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. राधिकाच्या वेडिंग सोहळ्यातील या लूकची सर्वत्र चर्चा आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नाला हॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. तर अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनाही या लग्नसोहळ्याचं आमंत्रण आहे.