Anganwadi workers strike at Azad Maidan!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 04:03 PM2017-09-12T16:03:57+5:302017-09-12T16:03:57+5:30Join usJoin usNext बेमुदत संप पुकारलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. (छाया- दत्ता खेडेकर) आझाद मैदानात धडकलेल्या या मोर्च्यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. (छाया- दत्ता खेडेकर) शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली होती. (छाया- दत्ता खेडेकेर) या समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर राज्यांत मिळणारे मानधन व इतर सुविधा यांचा अभ्यास केला होता. (छाया- दत्ता खेडेकर) राज्यातील ९७ हजार सेविका आणि ९६ हजार मदतनीस, तसेच १२ हजार मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधनवाढीचा अहवाल शासनाला दिला. (छाया- दत्ता खेडेकर) शासन मानधनवाढ करीत नसल्याने कृती समितीने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याची घोषणा केली. (छाया- दत्ता खेडेकर)