appa, you are always my guru, dhanajay munde on Gopinath gad parli
अप्पा, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात, गोपीनाथ गडावर टेकला माथा By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 04:46 PM2020-06-03T16:46:37+5:302020-06-03T17:14:51+5:30Join usJoin usNext सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका तथा माजी केंद्रीय मंत्री दिवंगत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड येथील स्मृतिस्थळी जाऊन त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. 03 जून 2014 रोजी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. राजकीय जडण घडणीत धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्या सोबतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रिय झाले होते. धनंजय मुंडे यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत असे सांगणारा एक संग्रहित व्हीडिओ पोस्ट करून एक भावनिक पोस्ट केली आहे. धनंजय मुंडे हे गोपीनाथरावांना अप्पा म्हणत, त्यांनी सत्तेत आल्यानंतर स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजूर, कष्टकरी, वंचित उपेक्षित, दीन-दुबळ्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी या सरकारमध्ये मिळाली असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गोरगरीब - कष्टकऱ्यांचे आयुष्यमान प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्याला काम करायचे असून, या वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी, विकासासाठी मला बळ द्या; अशी भावनिक साद धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टद्वारे घातली आहे. येणाऱ्या काळात गोरगरीब - कष्टकरी, वंचित - उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले तर तीच स्व. मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली असेल तसेच आपल्या गुरूला अर्पण केलेली गुरुदक्षिणा असेल असेही ना. मुंडे यांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या व भाजपा नेत्या पंकजा मुंडें यांनी मुंबईतील घरीच यंदा पुण्यतिथी साजरी करत वडिलांना अभिवादन केले मी भावनांचं भलमोठ पुस्तक आहे, अशा आशयाचं ट्विट करत पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे यांचा फोटो शेअर केला आहे पंकजा यांनी आपल्या कुटुंबासमेवत मुंबईतील घरी अभिवादन करत व सोशल मीडियातून पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनच्या कारणास्तव पंकजा यांना मुंबईतून परळीला जाता आले नाहीटॅग्स :गोपीनाथ मुंडेपंकजा मुंडेधनंजय मुंडेGopinath MundePankaja MundeDhananjay Munde