कसा-याजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे घसरले 9 डबे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 09:13 AM2017-08-29T09:13:35+5:302017-08-29T09:53:51+5:30

नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला. आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान घडली दुर्घटना

सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरुन पूर्णतः उलटलं

मुसळधार पावसामुळे माती-दगड रेल्वे रुळावर आली. यावेळी प्रसंगावधान दाखवून चालकानं ब्रेक लावला व मोठी दुर्घटना टळली

अपघातामुळे मुंबईकडे येणारी अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प

सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत

एक्स्प्रसेच्या एका कोचमध्ये आगदेखील लागली होती, ही आग प्रवाशांनीच अथक प्रयत्नांनी विझवली