प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 10:29 IST2024-01-26T10:20:35+5:302024-01-26T10:29:00+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

सोलापूर : आज प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.
यामुळे मंदिर परिसराचे रुप विलोभनीय, मनमोहक दिसत आहे.
दरम्यान, या सजावटीत झेंडु, शेवंती, लव्हेन्डर, गुलाब तसेच कामिनीचि पाने ,गुलाब अशा विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे.
श्री विठ्ठलाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप, रुक्मिणीमातेचा गाभारा तिरंगी रंगात सजवण्यात आला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान केले असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.