बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 16:11 IST2017-08-24T16:09:22+5:302017-08-24T16:11:28+5:30

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणरायाचे शुक्रवारी आगमन होतंय. बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच जोरदार सुरू आहे. बाप्पाच्या मुर्तीला घरी नेण्यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू आहे.

यंदा दशमीच्या वृद्धीमुळे बाप्पांचा मुक्काम १२ दिवस आहे. तब्बल सात वर्षांनंतर असा योग जुळुन आला आहे.

महाराष्ट्रासह देशभरात बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळते आहे.