Be careful! Corona buys armor policy, then read this ...
सावधान! कोरोना कवच पॉलिसी खरेदी करताय, मग हे वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:02 PM2020-07-28T17:02:09+5:302020-07-28T17:30:20+5:30Join usJoin usNext कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयांतील उपचारांवर होणाऱ्या वाढत्या खर्चाची दहशत कमी करण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीएआय) ३० विमा कंपन्यांना कोरोना कवच ही विशेष आरोग्य विमा पॉलिसी उपलब्ध करण्याची परवानगी दिली. विम्याची मुदत, विमाधारकाचे वय आणि विमा कव्हरनुसार ४५० ते ५ हजार ६०० रुपयांपर्यंतचा प्रीमियम भरून ही पॉलिसी घेता येईल. साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ महिने या तीन प्रकारच्या अल्प मुदतीच्या पॉलिसीतून ५० हजार ते पाच लाखांपर्यंतचे कव्हर विमाधारकांना मिळू शकेल. कोरोनावरील उपचारांसाठी सर्वसामान्यांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘कोरोना कवच’ आणि ‘कोरोना रक्षक’ या दोन पॉलिसी १० जुलैपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश ‘आयआरडीएआय’ने विमा कंपन्यांना दिले होते. इरडाच्या निर्देशानुसार बाजारात कोविड कवच विमा पॉलिसी सुरु झाली असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद या पॉलिसीला मिळत आहे. मात्र, या पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आलं आहे.. नागरिकांच होणारी फसवणूक लक्षात घेऊन, इरडाने नागरिकांना सावधानतेचं आवाहन केलंय. थेट कंपनी किंवा कंपनीच्या एजंटकडूनच ही पॉलिसी खरेदी करण्याची सूचना इरडाने केली आहे. नागरिकांना मोबाईलद्वारे पॉलिसी काढण्यासाठी काही फेक कॉल येत आहेत. त्यामध्ये, इरडाचे अधिकारी असल्याचे सांगून लालच दाखवतात. आरबीआय, विमा विभाग किंवा सरकारी कार्यालयाच्या नावाने ही फसवणूक होत आहे. इरडा म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने स्पष्ट केले की, कुठल्याही विमा पॉलिसीसाठी इरडाकडून कधीही कॉल केला जात नाही किंवा बोनस, वा खास योजना सांगण्यात येत नाहीत. त्यामुळे, नागरिकांनी पॉलिसी खरेदी करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आलंय ‘आयआरडीएआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कंपन्यांनी तयार केलेल्या कोरोना कवच या पॉलिसीला मंजुरी देण्यात आली आहे. तर, कोरोना रक्षक ही दुसरी पॉलिसी येत्या काही दिवसांत मंजूर होईल. १८ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना वैयक्तिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही स्वरूपात ही पॉलिसी घेता येईल. पती-पत्नी, आई-वडील, सासूसासरे आणि २५ वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा कौटुंबिक पॉलिसीत समावेश करता येईल. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे १५ दिवस आणि डिस्चार्जनंतर ३० दिवसांतील औषधोपचारांच्या खर्चाचा परतावाही त्यातून मिळेल. रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असलेल्या, मात्र १५ दिवसांपर्यंत घरीच उपचार घेतलेले, सरकारने कोरोना उपचारांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांतील उपचार खर्चाचा परतावासुद्धा त्यातून दिला जाईल. भौगोलिक ठिकाणानुसार प्रीमियमच्या रकमा बदलता येणार नाहीत.वैद्यकीय सेवांमध्ये सक्रिय असलेल्यांना पाच टक्के सवलत असेल. पीपीई किटसह उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कन्झ्यूमेबल गुड्सच्या बिलांचा परतावाही विमा कंपन्यांना कोरोना कवचच्या पॉलिसीधारकांना द्यावा लागेल. कोरोना कवच या पॉलिसीसाठी विमा कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईआरोग्यcorona virusMumbaiHealth