महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 01:57 PM2024-09-23T13:57:56+5:302024-09-23T14:04:52+5:30

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब होऊ शकते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे.

या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो महिलांना दोन टप्प्यांत अर्थसहाय्य देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार, याकडे महिला वर्गाची डोळे लागले आहेत.

अशातच या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून २९ सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून तिसरा हप्ता देत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब होऊ शकते.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आधी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र नंतर ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहील, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट अखेरपर्यंत सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना लाभ घेतला होता. या योजनेसाठी ४ हजार ७८७ कोटींचे वाटप करण्यात आले होते.