'भ्रष्टाचाराचा कोविड' म्हणत भाजपाचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन By महेश गलांडे | Published: March 4, 2021 06:32 PM 2021-03-04T18:32:52+5:30 2021-03-04T19:05:01+5:30
कोरोनाच्या नावाखाली राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. निविदा न मागविताच कोविडचे कोट्यवधीचे साहित्य खरेदी करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा आमदारांनी केला. तसेच, ठाकरे सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन केले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोना काळातील आरोग्य सुविधांचा आणि भ्रष्टाचारा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विधानसभेत विरोधकांनी कोरोना काळातील घटनांवरुन गंभीर आरोप केले.
आमदार रवि राणा यांनीही कोरोना कालावधीतील आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे आपल्या भाषणाता काढले, तसेच माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहीमेवरही टीका केली.
कोरोना काळात केवळ व्हेंटीलेटर न मिळाल्यामुळे 12 जणांचा जीव आपल्या मतदारसंघात गेल्याचे त्यांनी सांगितले, तसेच अनियमितता आणि भ्रष्टाचाराचेही आरोप त्यांनी लागवले.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोरोना काळात आरोग्य विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरुनही त्यांनी टीका केली
कोरोनाच्या नावाखाली राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. निविदा न मागविताच कोविडचे कोट्यवधीचे साहित्य खरेदी करुन भ्रष्टाचार करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आज भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन केले.
महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात भष्ट्राचार केला असून त्यावर प्रकाश टाकणारे 'भ्रष्ट्राचाराचा कोविड' हे पुस्तक प्रकाशित केल्याचे आमदार असीम साटम यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व आमदार उपस्थित होते.
मविआ सरकारने कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे अपेक्षित आहे. या अनुशंगाने कोरोनाच्या नावाखाली राज्यातील जनतेला मृत्यूच्या दारात लोटणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध असे म्हणत भाजपा आमदारांनी सभागृहाबाहेरील पायरीवर आंदोलन केले.
कोविड काळातील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपा आमदार भ्रष्ट्राचाराचे बॅनर झळकावत विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसले होते. त्यावेळी, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.