ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १६ - मलबार हील येथील राजभवनात ब्रिटिशकालीन भुयार आढळलं आहे. या भुयाराला राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी राहणाऱ्यांनी राज्यपालांना या भुयाराविषयी माहिती दिली होती. तेव्हा त्यांनी भुयार उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भुयार खोदण्याचे काम हाती घेतले. या भुयाराच्या पूर्व दिशेला असलेल्या प्रवेशद्वारासमोर बांधलेली भिंत तोडली. त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. भुयारात एकूण वेगवेगळ्या आकाराच्या १३ रूम सापडल्या. हे भुयार २० फूट उंच आहेत. दरम्यान, या भुयाराचे फोटो खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत. Glimpses of mine & Hon Governor's visit to the newly discovered tunnel at Raj Bhawan, Mumbai a while ago. https://t.co/eoMpu2zYTp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 16, 2016