नवरात्र उत्सव नऊ रंगांची उधऴण करण्यासाठी अनेक बाजारपेठा सजल्या आहेत.भोपाळमध्ये सार्वजनिक नवरात्र मंडळ देवीची मूर्ती आणताना भाविक.कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दुर्गा मातेची पुजा केली.कोलकाता येथे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासाठी मोठमोठे मंडप उभारले जातात आणि दुर्गा मातेची नऊ दिवस पुजा केली जाते.अलाहबाद येथील अलोपीदेवी मंदिरात देवीची पुजा करताना भाविक.देशाभरात ठिकठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येतो. रांची येथे नेपाळी महिलांनीही दुर्गा पुजा केली.राज्यात सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु असून तुळजापूरची भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहुरची रेणुका देवी ही तीन पूर्ण पीठं तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्ध शक्तीपीठ मानलं जातं.शक्तीचं प्रतीक मानलं जाणा-या देवीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे.