बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल..... कल्याणमधील विठ्ठल मंदिरातील विठुरायाचे हे भावपूर्ण रुप.आम्ही वारकरी... राज्यातील विविध शाळांमध्येही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणी व वारकरीच्या वेशभूषेतील ही चिमुकली मुलं वारकरी परंपरेचा वारसा पुढे नेण्याची ग्वाहीच देत होती.आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शीण गेला अवघा आनंद झालासुमारे ११ लाख भाविकांची मांदियाळी पंढरीत दाखल झाली असून चंद्रभागेत स्नान करताना भाविकराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील विठूरायाचे दर्शन घेतले.पंढरपूर येथील महापूजेवेळी एकनाथ खडसे बबनराव लोणीकर माधव भंडारी आदी मान्यवर नेत उपस्थित होते.विठ्ठल - रखुमाई मंदिरातील पूजेचा मान हिंगोलीच्या राघोजी व संगीता धांडे या दाम्पत्त्याला मिळाला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी धांडे दाम्पत्त्याचा सत्कारही केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते पहाटे विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्यातील दुष्काळाचे सावट दूर होवो असे असं साकडंही मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला गाठले.सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाल्यानंतर चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महापूर आला आहे. अवघी पंढरी विठुनामाच्या गजराने दुमदुमली आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारीतील क्षणचित्रे खास वाचकांसाठी...