Chief Minister Eknath Shinde's headache increased due to Cabinet expansion
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली?; मंत्रिमंडळ विस्तार रखडला कारण की... By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:24 AM2022-07-27T11:24:46+5:302022-07-27T11:27:05+5:30Join usJoin usNext महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागल्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपा यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. परंतु १ महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे कुठल्या फॉर्म्युल्यावर कॅबिनेटचं गठन होणार, कुणाचे किती मंत्री असणार याबाबत चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात २८८ विधानसभा सदस्य असल्यानं कायद्यानुसार जास्तीत जास्त ४२ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचाही समावेश आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये ४० मंत्री असतील. परंतु त्यात बंडखोर एकनाथ शिंदे गटाला किती मंत्रिपदे दिली जातील असा प्रश्न आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून २६ दिवसांनंतरही कॅबिनेट विस्तार नाही. राष्ट्रपती निवडणुकीनंतर विस्तार होईल असं सांगितले होते त्यामुळे आता शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या कॅबिनेट विस्तारावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ९ मंत्र्यांनीही बंड पुकारलं. ज्यात ५ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. त्यामुळे यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. त्याचसोबत दुसऱ्या बंडखोरांनाही मंत्री बनवण्याचं आश्वासन मिळालं आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळेल याच आशेवर ते विस्ताराकडे डोळे लावून आहेत. मविआत शिवसेनेला १० कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदे मिळाली होती. शिंदे यांच्यासोबत पक्षाचे ४० आमदार आहेत. तर अपक्ष १२ आमदार आहेत. अपक्षांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. सरकारमध्ये मित्रपक्ष, अपक्षांनाही सामावून घेतलं जाईल असं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाला ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपद हवीत. तर भाजपाला २९ मंत्रिपदं त्यांच्या कोट्यात हवीत. इतकेच नाही तर अपक्ष, मित्रपक्षांना भाजपाने त्यांच्या कोट्यातील मंत्रिपद द्यावे अशी शिंदे गटाची इच्छा आहे. त्यामुळे भाजपा हे कितपत ऐकतं हे पाहणं गरजेचे आहे. त्यातच भाजपा आमदारही मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. शनिवारी देवेंद्र फडणवीसांनी नेत्यांना मंत्रिपदाची अपेक्षा ठेवू नका असा सल्ला दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबतच भाजपातील नेत्यांना न दुखावण्याचं आव्हान वरिष्ठांसमोर आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला लागणारा विलंब पाहता काही संधीसाधूंनी आमदारांची फसवणूक करण्याचा डाव साधला. भाजपाच्या २ आमदारांना मंत्रिपद मिळवून देऊ सांगत त्यांना १०० कोटींची मागणी करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला अटक केली आहे. टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेभाजपाShiv SenaEknath ShindeBJP