पुढच्या वर्षी लवकर या... भक्तांना आठवतोय गतवर्षीचा 'विसर्जन' सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:57 PM2020-09-01T16:57:31+5:302020-09-01T17:24:02+5:30

गुलालाची उधळण करत व ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी (दि.१२) गणरायाचे विधिवत विसर्जन करून गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पांना निरोप दिला जातो.

अनंत चतुर्दशीनिमित्ताने लाखो गणेशभक्त आपआपल्या भागातील तलाव, नदी, विहीर आणि समुद्रठिकाणी जाऊन गणरायाचं विसर्जन करतात. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पांना भावूक होऊन निरोप दिला जातो.

गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी होतात. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू झाल्यानंतरदेखील भाविकांचा उत्साह कायम होता.

नदीपात्र परिसरात आल्यानंतर गणपतीचे विधिवत पूजन व आरती करून बाप्पांना मोदक खिरापत नैवेद्य दाखवत भक्तांनी गणेशमूर्तीचे नदीपात्रात विसर्जन केले जाते, तर गावागावात नदींमध्येही विसर्जन केले.

गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीची जल्लोषात तयारी सुरू असते, मुंबईत तब्बल 2 दिवस बाप्पांचे विसर्जन होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली बाप्पांचे विसर्जन करण्यात येत आहे.

सोशल डिस्टन्स पाळत गणरायाला निरोप दिला जात आहे, ना ढोलताशा वाजत आहे, ना भक्तांची मोठी गर्दी दिसून येते.

प्रशासनाकडून नागरिकांच्या घरातील गणपती बाप्पांचे एकत्रिकरण करुन गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात येत आहे.

आपल्या घराजवळील किंवा प्रशासनाने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन गर्दी न करता, गाजा वाजा न करता बाप्पांचे विसर्जन होत आहे.

पुण्यातील मानाच्या गणपतींची मोठी सवाद्य मिरवणूक निघत असते, मात्र, यंदा मिरवणुकीशिवाय बाप्पांचे विसर्जन होत आहे.

दूरुनच बाप्पांचे दर्शन घेतले जात आहे, पोलिसांच्या बंदोबस्तात नागरिकांकडून गर्दी टाळून बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा पाहिला जात आहे

पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पांचेही अशाचप्रकारे विसर्जन होत आहे, त्यामुळे दरवर्षी गजबजलेले रस्ते यंदा ओसाड पडले आहेत.

ठराविक लोकांच्या उपस्थितीत आणि मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह यंदा विसर्जन होत आहे. दरवर्षीचा गणेशोत्वसव आणि विसर्जन सोहळा यंदा भाविक आठवण करत आहेत.

लवकरात लवकर कोरोनाचं सकट दूर करा, कोरोनाचं विसर्जन तूच कर... बाप्पा असे म्हणत पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष होत आहे.

मुंबईतील समुद्रकिनारी दरवर्षी लाखो गणेभक्त जमत असतात, गणपती बाप्पांच्या मोठ-मोठ्या मूर्ती मुंबईचं आकर्षण असतं. मात्र, यंदाचा विसर्जन सोहळा असा निर्मनुष्य दिसत आहे.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी मुंबईत अनेकजण गर्दी करतात. कामाला सुट्टी देत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र, यंदाचे हे चित्र खूपच वेदनादायी आणि कोरोनाच्या संकटाची जाणीव करुन देणारं आहे.