Corona Virus: This Temple of Maharashtra State closed due to Corona pnm
Corona Virus: देवाक काळजी रे! कोरोनामुळे राज्यात देऊळ बंद; भाविकांनी 'या' मंदिरात जाऊ नये By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 03:39 PM2020-03-17T15:39:35+5:302020-03-17T15:48:51+5:30Join usJoin usNext तूळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बेमुदत काळासाठी बंद करण्यात आलं आहे. देहू येथील संत तुकाराम महाराजांचे मंदिर बंद करण्यात आलं आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या व वाढता संसर्ग लक्षात घेता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरातील ‘श्रीं’ची दर्शन सुविधा ३१ मार्चपर्यत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत आळंदी येथे माऊलींचं दर्शन भाविक भक्तांना घेता येणार नाही. मुंबईतील प्रसिद्ध प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलं आहे. मुंबईतील मुंबादेवी मंदिरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केले आहे. कोल्हापूर येथील जोतिबा मंदिर बंद, दख्खनचा राजा जोतिबाचे गाभारा दर्शन भाविकांना बंद केले आहे. मुखदर्शन सुरू आहे. सर्व दार दरवाजे बंद केले आहेत. शिर्डी येथील साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १९४१ साली कॉलरामुळे ब्रिटिशांनी रामनवमी उत्सवात भाविकांसाठी मंदिर बंद ठेवले होते. ८९ वर्षापूर्वीच्या निर्णयाची आजच्या निर्णयाने पुनरावृत्ती होत आहे. कोरोना व्हायरसच्या धर्तीवर अनेक मोठे निर्णय होत आहेत. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलं आहे टॅग्स :कोरोनामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमंदिरसाईबाबाcorona virusCoronavirus in MaharashtraTemplesaibaba