CoronaVirus: How Migrated workers in mumbai are living during Lockdown ajg
CoronaVirus Lockdown: मजबूर मजदूर... हे फोटो पाहून त्यांचं दुःख कळेल, वाईट वाटेल! By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 07:44 PM2020-04-16T19:44:07+5:302020-04-16T20:17:22+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसविरुद्ध सुरू असलेल्या लढाईचा भाग म्हणून देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत कायम ठेवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलला सकाळी केली. लोकडाऊन - 1 प्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुढेही सुरू राहील, इतर सर्व सेवा बंद राहतील, असं त्यांनी जाहीर केलं. मात्र, या घोषणेनंतरही संध्याकाळी अचानक वांद्रे स्टेशनवर हजारो लोक जमले आणि एकच खळबळ उडाली. हे एवढे लोक कसे जमले, कुणी काही वस्तू वाटणार असल्याच्या मेसेजमुळे ते आले, की ट्रेन सुरू होऊन घरी जायला मिळणार या अफवेमुळे; याचा शोध उच्चस्तरीय पोलीस यंत्रणा घेत आहेत. मात्र, या प्रकरणामुळे स्थलांतरित मजुरांच्या समस्या, लॉकडाऊनमुळे झालेली कोंडी हे विषय ऐरणीवर आले आहेत. या निमित्ताने, ‘लोकमत’चे फोटोग्राफर सुशील कदम यांनी रे रोड इथल्या दारुखान्यात जाऊन तिथल्या मजुरांचं रोजचं जगणं, लॉकडाऊनमुळे ओढवलेली परिस्थिती, त्यांचं दुःख, व्यथा कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. कधी एकदा घरी जायला मिळतंय, कधी एकदा मोकळा श्वास घ्यायला मिळतोय, अशी या मजुरांची अवस्था का झालीय, हे या फोटोंमधून सहज लक्षात येतं. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झालाय, उत्पन्न बंद झालंय. काही स्वयंसेवी संस्था जेवण पुरवतात, पण अनेकांना राहायला पुरेशी आणि बरी जागाही नाही. एरवी दिवसभर बाहेर असल्यानं रात्री झोपण्यापुरती जागा पुरते. पण, आता दिवसभर अंधाऱ्या खोलीत काढणं त्यांना नकोसं होतंय. त्यात, मनामध्ये कोरोनाची भीती आहेच. आजारी पडलो तर काय होईल, उपचार मिळतील का, घरी पोहोचू का, ही धाकधूकही मनात आहे. म्हणूनच, लॉकडाऊन लवकरात लवकर संपावा आणि ट्रेन सुरू व्हाव्यात किंवा रोजगार तरी सुरू व्हावा, अशी प्रार्थना हे मजूर करत आहेत.