Lockdown : एका लग्नाची गोष्ट; तीन फुटाचा नवरा अन् चार फुटाची नवरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 23:48 IST2020-05-08T23:19:12+5:302020-05-08T23:48:32+5:30

तीन फुटाचा नवरा आणि चार फूट उंच असलेल्या नवरीचा विवाह सोहळा धुळ्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या भरवाडे येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये चर्चा झाली, ती म्हणजे त्या दोघांच्या उंचीची.

शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथील 29 वर्षीय झांबरु राजेंद्र कोळी आणि चार फूट उंची लाभलेली कुरखळी येथील 19 वर्षीय नयना कैलास कोळी यांचा विवाह तापी काठी जोगाई माता मंदिरात पार पडला.

झांबरु कोळी आणि नयना यांच्या लग्नात त्यांच्या जवळील नातेवाईक उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यात सध्या या सर्वात कमी उंचीच्या नवरा आणि नवरीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लोकांची मोठी गर्दी होईल, असे समारंभ करण्यास सरकारने बंदी घातली आहे.

मात्र, कोरोनाची स्थिती पाहून संबंधित ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थित लग्न समारंभ करण्यास परवानगी आहे.