भाजपा नेते ठाकरे सरकारच्या विरोधात, देवेंद्र फडणवीस, खडसे, राणे दिसले आंदोलनात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 03:41 PM2020-05-22T15:41:55+5:302020-05-22T16:06:49+5:30

भाजपा आमदार आणि राणेपुत्र नितेश व निलेश राणे यांनीही महाराष्ट्र बचाव आंदोलनात सहभाग घेत राज्य सरकारवर टीका केली आहे.

कोरोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना भाजपाने आज उद्धव ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन सुरू केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे या आंदोलनात सहभाग घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

सध्या पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य भाजपाने सरकारविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूर येथील घरी महाराष्ट्र बचाव आंदोलन करत, राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

भाजपा नेते आणि माजी मंत्री एड. आशिश शेलार यांनीही उत्फुर्तपणे या आंदोलनात सहभाग घेत, सरकारवर टीका केली.

एकनाथ खडसे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेतला. तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले.

एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी कुटुंबीयांसह आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुनबाई खासदार रक्षाताई खडसे यासुद्धा उपस्थित होत्या. उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार, असा टोला खडसे यांनी यावेळी बॅनरच्या माध्यमातून लगावला.

भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाद्वारे उद्धव ठाकरे सरकारवर प्रहार केला आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचं म्हटलंय

पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही या आंदोलनात सहभाग घेत राज्य सरकारच्या कामाचा निषेध नोंदवत टीका केली.

भाजपाच्या आंदोलनात अनेक नेते सक्रीय झाल्याचे दिसून आल, पण पंकजा मुंडे यांचा अद्याप फोटो दिसला नाही किंवा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही त्या आंदोलनात सक्रीय असल्याचे दुपारी ४ वाजेपर्यंत दिसून आले नाही