Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: followers celebrates ambedkar jayanti at home due to lockdown
लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत भीमसैनिकांचं बाबासाहेबांना अभिवादन! By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 08:10 PM2020-04-14T20:10:20+5:302020-04-14T20:27:49+5:30Join usJoin usNext संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या दहशतीखाली असताना, भारतातही या संकटाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन आज संपणार होता. मात्र, तो ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात राहूनच साजरी करण्याचं आवाहन सर्व नेतेमंडळींनी केलं होतं. त्याला भीमसैनिकांनी अगदी सकारात्मक प्रतिसाद दिला. (फोटोः तन्मय ठोंबरे)) दरवर्षी बाबसाहेबांच्या जयंतीला नागपूरमधील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमतात आणि महामानवाला अभिवादन करतात. मात्र, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आज कुणीही घराबाहेर पडलं नाही. कोरोना संकटावर मात करण्यासाठी घरी राहणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळणं अपरिहार्य होतं आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी आपलं हे कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं. (फोटोः तन्मय ठोंबरे)) दीक्षाभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळही दरवर्षी आंबेडकर जयंतीला गर्दी असते. तिथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी येतात. मात्र, यंदा हा परिसरही शांत होता. मुंबईत चैत्यभूमीवरही अनेक भीमसैनिक बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जातात. मात्र, यंदा सगळ्यांनी घरच्या घरीच बाबासाहेबांना वंदन केलं. काही जणांनी घरातच संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं, तर काहींनी घरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. (फोटोः सुशील कदम) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ ट्विट करून बाबासाहेबांना अभिवादन केलं. तसंच, देशाला संबोधित करताना त्यांनी राष्ट्रनिर्मितीतील डॉ. आंबेडकरांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसनरेंद्र मोदीउद्धव ठाकरेDr. Babasaheb AmbedkarCoronavirus in MaharashtraNarendra ModiUddhav Thackeray