Due to heavy rain in Sangli, Kolhapur, flood situation in the city
सांगली, कोल्हापुरात महापूर; शहरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत- पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 10:12 AM2019-08-06T10:12:45+5:302019-08-06T10:17:41+5:30Join usJoin usNext मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे. सांगली जिल्ह्यातील 21 पूल पाण्याखाली आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. २४ जुलै १९८९ रोजी पंचगंगा नदीचे पाणी पंचगंगा रुग्णालयाच्या मारूती मंदिराजवळ आले होते . इथपर्यंत पुराचे पाणी कधीच आले नव्हते. त्यामुळे महापालिकेने तेथे त्या घटनेची खूण म्हणून एक शिळा लावली. सोमवारी मध्यरात्री त्या ठिकाणी पुराचे पाणी पोहोचले. पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सांगलीतील पुरामुळे एसटी स्टँडमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. 604 एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीला पूर आल्याने पुणे-बंगळुरु हायवेवर पाणी आलं आहे. शिरोळनजीक पुलावर पाणी साचल्याने बंगळुरुकडे जाणारी वाहतूक किणी टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली आहे टॅग्स :पाऊसपूरRainflood