Eknath Shinde Revolt: Chartered Plane and Luxury Hotel, Shiv Sena rebel MLAs spend money a day?
Eknath Shinde: चार्टर्ड प्लेन अन् लग्झरी हॉटेल, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा दिवसाचा खर्च किती? By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 04:22 PM2022-06-23T16:22:25+5:302022-06-23T16:26:01+5:30Join usJoin usNext शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास विकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेवर राजकीय संकट उभे राहिले आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावर पायउतार व्हावं लागेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपाचं केंद्रबिंदू हे मुंबईपासून २७३० किमी दूर असलेल्या गुवाहाटीच्या रेडिशन ब्लू हॉटेलमध्ये आहे. याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक ४२ आमदारांसह थांबलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आणि अपक्ष ५ आमदार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीत हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा चर्चेत आले आहे. कारण यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. महाराष्ट्राच्या सरकारवर राजकीय संकट आहे परंतु त्याचा प्लॅन सूरतमध्ये रचला. शिवसेनेचे बंडखोर आमदार सर्वात आधी सूरतमध्ये पोहचले. त्याठिकाणाहून चार्टर्ड प्लेननं सगळे गुवाहाटीला आले. विशेष म्हणजे बंडखोर २-२, ३-३ गटाने सूरतला पोहचले. काही आमदार मंगळवारी तर काही बुधवारी गुवाहाटीला पोहचले. गुरुवारी सकाळी शिवसेनेचे ४ आमदार गुवाहाटीत दाखल झाले. सूरतहून त्यांना चार्टर्ड विमानाने गुवाहाटीला पाठवले जात आहे. त्यामुळे याचा खर्च नेमका किती आहे याचा अंदाज तुम्हालाही आला असेल. आमदारांच्या बंडाच्या पवित्र्याने शिवसेना पक्षनेतृत्व टेन्शनमध्ये आले आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्री गाठले आहे. बंडखोरांना परत आणण्यासाठी ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र नाराज आमदारांची संख्या वाढतच गेली. सध्याच्या घडीला ४० हून अधिक आमदार गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. रेडिशन हॉटेलच्या परिसरात पोलिसांनी सुरक्षेचे कवच बनवलं आहे. भलेही भाजपा नेते यात आमचा काही संबंध नसल्याचा दावा करत असले तरी वास्तव वेगळे आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी काळजी भाजपा घेताना दिसते. रेडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये भाजपा नेत्यांचा वावर वाढला आहे. सूत्रांनुसार, आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही बंडखोर आमदारांची भेट घेतली. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ९० लोकांच्या राहण्यासाठी ६ दिवसांचे बुकींग करण्यात आले आहे. त्यात शिवसेनेचे बंडखोर आमदारांचाही समावेश आहे. आमदारांची वाढती संख्या पाहता आणखी काही रूम खाली करण्याच्या सूचना आहेत. रेडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये एका रूमचं भाडे दिवसाला ६८०० रूपये आहे. याठिकाणी डिलएक्स रुमचं भाडे ८००० रुपये प्रतिदिन आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवत सत्तापालट करण्यासाठी बंडखोर आमदारांची किती व्यवस्था करण्यात आलीय. कितपत खर्च होत आहे हे दिसून येत आहे. इतकेच नाही तर चार्टर्ड प्लेनचा खर्च ८० हजार प्रतितास ते ५-६ लाख रुपयांपर्यंत आहे. टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेभाजपाShiv SenaEknath ShindeBJP